मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचा तपशील सांगितला. राजकारण बाजूला ठेवा, देशातील महत्त्वाचं राज्य म्हणून केंद्राने सहकार्य करावं, अशी मागणी मोदींकडे केली. मोदींनी सहकार्याचं आश्वासन दिले आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मी अनेक वेळा दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आलो. भेटीत खूप चांगली चर्चा झाली. महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. केंद्राचं सहकार्य राज्याला मिळावं असं मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सहकार्य करु असं सांगितलं. सीएए, एनआरपीबाबत देखील चर्चा केली. या सगळ्याबद्दल मी आगोदरच माझी भूमिका सांगितली आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली. सीएएबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या भेटीत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा केली. हा कायदा कुणाला देशातून काढण्यासाठी झालेला नाही. शेजारच्या राष्ट्रातील हिंदू बांधवांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. जनगणना होणं आवश्यक आहे. सीएए केवळ आसामपर्यंत मर्यादित राहिल. एनआरसी केवळ आसामपर्यंत मर्यादित राहिल. एनपीआर कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी होते. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तर तेव्हा नक्कीच आक्षेप घेऊ असं उद्धव ठाकरेंनी म्हटले .
आंदोलन करणाऱ्यांना ज्यांनी भडकावलं आहे त्यांनी हा कायदा समजून घेण्याची गरज आहे. जीएसटीचा पैसा येत आहे, मात्र ज्या वेगात यायला हवा त्या वेगात येत नाही. शेतकरी विम्याबाबतही चर्चा केली. जीएसटीचे पैसे येत आहेत. मध्ये मी पत्र लिहिलं तेव्हा काही पैसे आले आहेत, मात्र हे पैसे येण्याचा वेग वाढायला हवा. आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणत आहोत. त्यासाठी पैसा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याशी संबंधित ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्यावर चर्चा झाली. राजकीय घडामोडी एकीकडे मात्र राज्यासाठी केंद्राचा पाठिंबा हवा, असं मोदींना सांगितलं. त्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं. राज्य आणि केंद्र समन्वयातच सगळ्या गोष्टी आल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या बैठकीत सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा झाली अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. “मी सीएए, एनपीआर, एनआरसीबाबत ‘सामना’त माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सीएए’ला घाबरायची गरज नाही. एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. मी माझ्या राज्यातील नागरिकांना आश्वासन दिलं आहे की कुणाचाही अधिकार हिरावून घेतला जाणार नाही.
जे मला माहित आहे ते मी बोलत आहे. एनआरसीमुळे फक्त मुस्लमांसाठी नाही तर सगळ्यांनाच लायनीत उभं राहावं लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
देशाची जनगणना दर दहा वर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो खतरनाक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीएसटीच्या निधीबाबत पत्र पाठवले होते. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान शेतकरी पीक विमा योजना या विषयावर चर्चा झाली.
दरम्यान, सीएएविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता काँग्रेससोबत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात शांतता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय आमचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालू आहे, असं ते म्हणाले. आम्ही मन बनवलं आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामनुसार सरकार पुढं जात आहे. जीएसटीच्या माध्यमातून पैसे येण्याची पध्दत खूप हळू आहे ती वाढायला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.